दाभोली भागातील मराठी शाळांमध्ये मुलांना टिफीन बॉक्स आणि खाऊचे वाटप

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजन

वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली भागातील मराठी शाळांमध्ये आज सोमवारी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या वाढदिवसा निमित्त मुलांना टिफीन बॉक्स आणि खाऊचे वाटप करण्यात आले.

यावेळी प. स. सदस्य शितल श्रीकृष्ण बांदवलकर – राऊत, माजी जि. प. अध्यक्ष समिधा नाईक, वायंगणी सरपंच अवी दुतोंडकर, वायंगणी उपसरपंच अनंत केळजी, दाभोली उपसरपंच श्रीकृष्ण बांदवलकर, वायंगणी माजी उपसरपंच हर्षद साळगावकर, सोसायटी चेअरमन प्रशांत खानोलकर,, ग्रा. प. सदस्य विद्या कांबळी, राखी धोंड, विद्या गोवेकर, वेतोरे ग्रामपंचायत सदस्य संगिता संदिप नाईक.,सौरभ नाईक, यशश्री योगेश नाईक.,सौरभ नाईक, सामाजिक कार्यकर्ते योगेश नाईक आणि सर्व कार्यकर्ते. यावेळी उपस्थित होते. यावेळी वेतोरे शाळा नंबर १, वेतोरे मिरमेवाडी शाळा, वायंगणी शाळा नंबर १, शाळा वायंगणी, शाळा नंबर २ शाळा केंद्रशाळा वायंगणी सुरंगपाणी एवढ्या शाळेत मुलांना टिफीन बॉक्स आणि खाऊ वाटप करण्यात आले.