एस एस पी एम हॉस्पिटल पडवे ,माजी सरपंच श्री सुमन कामत आणि वायंगणी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रशाळा सुरंगपाणी येथे शुक्रवार दिनांक ११ ऑगस्ट २०२३ रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले . इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली .यावेळी डॉ. संजय जोशी, श्री गोसावी ,श्री लुडवे यांच्या टीमने विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यांना डोळ्याचे महत्व डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याची माहिती दिली .
या कार्यक्रमाला माजी सरपंच श्री सुमन कामत, माझी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री प्रवीण राजापूरकर,
स्वयंसेविका श्रीमा लीला मांजरेकर, विषय शिक्षक श्री सर्वेश राऊळ उपस्थित होते
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम शामल मांजरेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले .












