बी. फार्म. प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; माडखोलच्या व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसीत मोफत सुविधा उपलब्ध

 

महाराष्ट्रामध्ये बी. फार्म. (B. Pharm.) या फार्मसी कोर्सच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (State CET Cell) आणि तंत्रशिक्षण संचालनालय (DTE, मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जात आहे. यासंदर्भात सर्व विद्यार्थी आणि पालकांनी नोंद घेऊन अधिकृत सुविधा केंद्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शासनाकडून नियुक्त करण्यात आलेल्या स्क्रुटिनी सेंटर (Scrutiny Center) द्वारे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरणे, भरलेले अर्ज व आवश्यक मूळ कागदपत्रांची अचूक पडताळणी करणे, तसेच पुढील प्रवेश फेऱ्यांसाठी ऑप्शन फॉर्म भरणे या सर्व प्रक्रिया पूर्णपणे मोफत आणि निःशुल्क पार पाडल्या जातात.

बी. फार्म. ऑनलाईन प्रवेश नोंदणी आणि कागदपत्रांच्या पडताळणीसाठी सावंतवाडी-आंबोली स्टेट हायवेवर असलेल्या माडखोल येथील अधिकृत सुविधा केंद्र ‘व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी’ (केंद्र कोड: ३४९०) येथे प्रत्यक्ष भेट देऊन या सुविधेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी व संपर्कासाठी ९७६३८२४२४५ आणि ९४२०१९६०३१ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.