राजापूर प्रतिनिधी: राजापूर तालुक्यातील ताम्हाणे गावात जमिनीचा वाद आणि जादूटोण्याच्या संशयावरून सतत मानसिक त्रास देऊन एका व्यक्तीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित व्यक्तीच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून राजापूर पोलीस ठाण्यात ६ संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२०१५ मध्ये संशयित आरोपी नामदेव ताम्हणकर यांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू पीडित व्यक्तीने केलेल्या देवदेवस्कीमुळेच झाला असल्याचा संशय घेऊन संशयित आरोपी नामदेव गोविंद ताम्हणकर व अनिता नामदेव ताम्हणकर हे मागील १० वर्षांपासून त्यांना सतत टोचून बोलून व शिवीगाळ करून मानसिक त्रास देत होते. तसेच इतर संशयित आरोपी मनोहर सोमा ताम्हणकर, मनिषा मनोहर ताम्हणकर, विशाल मनोहर ताम्हणकर आणि सागर मनोहर ताम्हणकर यांनी जमिनीच्या वादातून पीडित व्यक्ती व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
जमिनीच्या वादातून आणि अंधश्रद्धेच्या संशयावरून सतत शिवीगाळ व तीव्र मानसिक त्रास देऊन पीडित व्यक्तीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी नामदेव ताम्हणकर, अनिता ताम्हणकर, मनोहर ताम्हणकर, मनिषा ताम्हणकर, विशाल ताम्हणकर आणि सागर ताम्हणकर (सर्व रा. ताम्हाणे, ता. राजापूर) या संशयित आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून राजापूर पोलीस पुढील अधिक तपास करत आहेत.
Home महत्वाच्या बातम्या राजापूर तालुक्यात खळबळ: जमिनीचा वाद अन् अंधश्रद्धेच्या संशयातून छळ; ६ संशयित आरोपींविरुद्ध...












