ओटवणे (प्रतिनिधी ) तांबूळी वरचीवाडी येथील उद्योन्मुख खेळाडू ओंकार नागेश सावंत भोसले याची सिंधुदुर्ग क्रिकेट असोसिएशन अंडर १७ संघात निवड झाली असून त्याच्या या निवडी बद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतअसून त्याच्या निवडीने तांबूळी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तांबूळी सारख्या ग्रामीण भागातून टेनिस क्रिकेटचे धडे गिरविले.ओंकारला टेनिस क्रिकेट ची लहानपणापासूनच आवड त्यातच गावातील मुलांमध्ये टेनिस क्रिकेट खेळता खेळता त्याच्या खेळात सुधारणा होत गेली.कठोर मेहनत, सातत्य,जिद्द याच्या जोरावर सुरेख खेळ साकारत त्यांनी अनेक लहान मोठ्या स्पर्धात आपल्या खेळाची चुणूक दाखविली त्यांनी टेनिस क्रिकेट साठी ट्रायल दिली आणि त्याच्यातील असणाऱ्या गुणवत्तेने निवड कर्त्यांची मने जिंकली आणि त्याची सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट संघात निवड करत सिंधुदुर्गच नेतृत्व करण्याची संधी दिली. या मिळालेल्या संधीच सोन करत त्यांनी जिल्याच्या टेनिस क्रिकेटच नावं राज्यस्थरावर उंचवावं अशा शुभेच्छा देण्यात येत आहेत












