फोंडाघाट | कुमार नाडकर्णी — फोंडाघाट सारख्या संवेदनशील गावात, कायद्याच्या चौकटीत राहून, सर्वांना न्याय देण्याचे काम करत असताना, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी फोंडाघाट आऊट पोस्टचे हेड कॉन्स्टेबल उत्तम वंजारे यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. ग्रामपंचायतीच्या विविध उपक्रमामध्येही प्रशासनाची भूमिका योग्य रीतीने बजावताना, सहकार्य केले. त्यामुळे ते या सत्कारास पात्र आहेत असे गौरवोद्गार सरपंच सौ संजना आग्रे यांनी काढले.
फोंडाघाट आउट पोस्ट येथे भेट घेऊन ग्रामपंचायत तर्फे उत्तम वंजारे यांचा सत्कार मान्यवरांचे हस्ते, श्रीफळ- शाल- पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. यावेळी सदस्य पिंटू तथा मिथील पटेल, प्राची धुरी, हेमंत लाड तसेच विश्वनाथ जाधव आप्पा म्हस्कर, ग्रामसेवक मिलिंद राणे इत्यादी उपस्थित होते.यावेळी सर्वांनीच वंजारे यांच्या कार्याचा गौरव केला. आजवर पोलिसांपैकी वंजारे यांचा पहिला सत्कार व ते त्या सत्काराचे खरे मानकरी— ही त्यांच्या कामाची पोचपावती आहे. असे सर्वांनी सांगितले.
सत्कार प्रसंगी गेल्या पाच वर्षातील कार्यकाळात, केलेल्या प्रामाणिक कामाबद्दल झालेल्या सत्कारासाठी समाधानी असल्याचे मत व्यक्त करून, पोलीस वंजारे यांनी येणाऱ्याला सुद्धा असे सहकार्य करा– असे आवाहन केले. शेवटी ग्रामसेवक मिलिंद राणे यांनी आभार मानले…












