वेत्ये येथे युवकाची विष प्राशन करून आत्महत्या 

सावंतवाडी : वेत्ये रस्तावाडी येथील रहिवासी राजन रामा गावडे ( वय ४५ ) या युवकाने आपल्या राहत्या घरी बंद खोलीत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. आज पहाटे पाच वाजता घरात औषधाची दुर्गंधी येत असल्याने रूमचा दरवाजा ठोठावला असता प्रतिसाद येत नसल्याने दरवाजा तोडून पाहिले असता तो मृतावस्थेत आढळून आला. याबाबतची खबर सावंतवाडी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला आहे. मृत राजन याच्या पश्चात आई मुलगा भाऊ वहिनी पुतणे असा परिवार आहे. मात्र त्याने आत्महत्या नेमकी का केली याबाबत काही माहिती मिळू शकली नाही. या घटनेची माहिती मिळताच वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले होते. राजनच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करण्यात आला.