कोर्टाने सील केलेल्या घरात प्रवेश करणाऱ्या घर मालकावर गुन्हा

रत्‍नागिरी ः प्रतिनिधी
शहरानजीकच्या कर्ला येथील कोर्ट कमिशनरने सिल केलेले कुलुप लावून बंद केलेल्या घरात बेकायदेशिरपणे प्रवेश केला. याप्रकरणी घरमालकावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 1 जुलै 2026 रोजी दुपारी 1.30 ते 2 जुलै रोजी दुपारी 3.30 वा.कालावधीत घडली आहे.
दिगंबर शंकर किर (रा.जुवे ग्रामपंचायत कर्ला,रत्‍नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्‍याच्या विरोधात बँक ऑफ इंडियाचे झोन ऑफीसर राजीवकुमार श्रीबीश्वेश्वर प्रसाद (51, मुळ रा. झारखंड सध्या रा. शिवाजीनगर, रत्‍नागिरी) यांनी बुधवार 5 ऑगस्ट रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्‍यानुसार,कोर्ट कमिशन यांनी संशयित दिगंबर किर यांची मालमत्‍ता सिल करुन फिर्यादीच्या ताब्यात दिली होती. त्‍या मालमत्‍तेला लावण्यात आलेले सिलचे कुलप संशयिताने तोडून तो कुटंबाहस आतमध्ये प्रवेश करुन वास्तव्य करत असल्याचे निदर्शनास आल्यावर फिर्यादीने ही तक्रार दिली आहे. तक्रारीवरुन संशयिताविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 329(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.