बामणोली येथे १९ रोजी शिवजयंती उत्सव

अशोक वनगे आणि कुणबी समाज संघटना बामणोली यांचे आयोजन

चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील बामणोली येथे कुणबी समाज संघटना शाखा बामणोली व सामाजिक कार्यकर्ते अशोक वनगे आणि परिवार यांच्या माध्यमातून गुरुवार दिनांक १९ रोजी शिवजयंती उत्सव आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन वनगे परिवार तर्फे करण्यात आले आहे.

गुरुवारी सकाळी ९.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे विधी व पूजन, सकाळी १०.३० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, सकाळी ११ ते १ वाजता छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मिरवणूक, दुपारी १ ते २.३० शिवभोजन, दुपारी ३ ते ४ मान्यवरांचा सत्कार व शालेय विद्यार्थी मनोगत, सायंकाळी ५ वाजता महिला हळदीकुंकू समारंभ, रात्री ७ वाजता ह भ प कुमारी ईश्वर येसरे कळंबनी खेड यांचे कीर्तन, रात्री ९ वाजता शिवभोजन, आणि रात्री ११ वाजता जय भराडीन देवी नमन खानवली चिंचवाडी लांजा यांचा कार्यक्रम होईल
या शिवजयंती कार्यक्रमाला गुहागर विधानसभेचे आ. भास्कर जाधव, समाज नेते राजेश बेंडल, कुणबी समाजोन्नती संघ सहसचिव माधव कांबळे, कुणबी संघ शाखा चिपळूण मुंबई अध्यक्ष चंद्रकांत कोकमकर, कुणबी संघ शाखा ग्रामीण चिपळूण अध्यक्ष ॲड.भाई कुळे, सरपंच सुदेश गमरे, उपसरपंच शांताराम चांदिवडे, श्री वाघेश्वरी ग्रामदेवता ट्रस्ट अध्यक्ष सिताराम तांबे, नवजवान मित्र मंडळ किजबिलेवाडी मुंबई अध्यक्ष सुरेश चांदिवडे, कुणबी संघटना बामनोली अध्यक्ष तानाजी वणे, सचिव नरेश पागडे, नवजवान मित्र मंडळ किजबिलेवाडी स्थानिक अध्यक्ष दत्ताराम फावरे आणि आरती निराधार सेवा फाउंडेशन मालघर येथील शिक्षक व विद्यार्थी वर्ग आधी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या शिवजयंती उत्सवाला सर्वांनी आवर्जून उपस्थिती रहावे, असे आवाहन अशोक वनगे यांनी केले आहे.