केंद्रशाळा साळशी नं. १ ला वॉटर फिल्टरची भेट

सामाजिक जाणिवेतून शाळेला मोलाची देणगी;

शिरगाव (प्रतिनिधी) :
विद्यार्थ्यांना स्वच्छ, शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या सामाजिक जाणिवेतून साळशी येथील शिक्षणप्रेमी संताजी महादेव नाईक यांनी केंद्रशाळा साळशी नं. १ ला वॉटर फिल्टर देणगीस्वरूपात भेट दिला.

या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना वर्षभर शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही देणगी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत शिक्षण क्षेत्राप्रती असलेली सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संताजी नाईक यांच्या या स्तुत्य कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने दिलेल्या या मोलाच्या देणगीबद्दल शाळेच्या व संस्थच्यावतीने त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

यावेळी विविध पदाधिकारी, मान्यवर, मुख्याध्यापक, सहशिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.