वैभववाडीत हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांना रक्तदानातून मानवंदना

२० जणांनी केले रक्तदान

वैभववाडी प्रतिनिधी
देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त वैभववाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सामाजिक बांधिलकी जपत २० रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून शहीद मेजरांना अनोखी मानवंदना अर्पण केली.
शहीद मेजर कौतुभ रावराणे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी यावेळी जि प सदस्य प्रमोद रावराणे, भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, संचालक शरद रावराणे, सतीश रावराणे, विजय रावराणे, प्राचार्य के. सी. चव्हाण, आदी उपस्थित होते.
आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान (वैभववाडी), रावराणे मित्र मंडळ (वैभववाडी) आणि राजेश मो. पडवळ जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.