वैभववाडी प्रतिनिधी :
वैभववाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ आणि ग्रामपंचायत नाधवडे यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी संवाद शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार, दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता ग्रामपंचायत नाधवडे येथे होणार आहे.
या संवाद शिबिरामध्ये आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना शेतीविषयक विविध बाबींवर माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी व समस्यांचे निराकरण, उत्पादनाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन तसेच कृषी क्षेत्रातील नवीन संधींबाबत तज्ज्ञांकडून सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
तालुक्यातील सर्व आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.












