गुहागर प्रतिनिधी:
गुहागर विधानसभा मतदारसंघात गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. देशभक्तीची भावना जागृत करणार्या या रॅलीत नागरिक, युवक, युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.ही रॅली बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ठीक १० वाजता आयोजित करण्यात आली आहे.
रॅलीचा मार्ग शृंगारतळी विनायका पेट्रोल पंप ते निलकंठेश्वर मंदिर असा असणार आहे. या रॅलीच्या माध्यमातून तिरंग्याचा सन्मान, अभिमान आणि राष्ट्रभक्तीची भावना जनमानसात अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात येणार आहे. नागरिकांनी, युवक, युवतींनी स्वयंप्रेरणेने, उत्स्फूर्तपणे व मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजक निलेश विश्वनाथ सुर्वे यांनी केले आहे. हर घर तिरंगा… तिरंगा रॅली या उपक्रमातून गुहागरमध्ये देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळणार आहे.













