वेंगुर्ले l प्रतिनिधी :रोटरी क्लब रत्नागिरी आयोजित पहिली रोटरी अंडरआर्म टर्फ क्रिकेट टूर्नामेंट उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. या स्पर्धेत रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.
कुडाळ, लोटे, वेंगुर्ला तसेच विविध रोटरी क्लबच्या सदस्यांनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. संपूर्ण स्पर्धेदरम्यान खेळाडूंमध्ये उत्साह, मैत्रीपूर्ण वातावरण आणि खिलाडूवृत्ती पाहायला मिळाली.
अंतिम सामन्यात रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत रत्नागिरी संघावार मात करीत विजय मिळवला. या विजयाबद्दल संघाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या कुडाळ, लोटे, वेंगुर्ला आणि रत्नागिरी येथील सर्व रोटरी सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. सर्वांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडली.












