माखजन | वार्ताहर :
ह.भ.प.वैकुंठवासी शशिकाला गणपत गोटेकर यांच जे जे हॉस्पिटल मुंबई येथे उपचारादरम्यान २७ जुलै रोजी आकस्मित निधन झालं होतं,त्यांना आंबव पोंक्षे येथे सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. फोटो पूजन करण्यात आले. वारकरी संप्रदायाचे हभप विष्णू मनोहर धांगडे महाराज यांनी प्रवचन रुपी मार्गदर्शन करून सर्वांना वारकरी संप्रदायाचा उद्देश,महत्व सांगून हभप वै.शशिकला गोटेकर यांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली.
दत्तप्रसादिक वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष ह.भ.प यशवंत साळवी महाराज यांनी उपस्थित जनसमुदायाला वारकरी संप्रदायाची माहिती देऊन ह भ प वै. शशिकला गोटेकर यांच्या कार्याचा आढावा घेत श्रद्धांजली वाहिली.
यावेळी समाजनेते सुरेशजी भायजे,सुरेश जुवले, प्रा. नितीन लोकम, प्रा. संदीप येलये सर , डावल गुरुजी ,संतोष चांदे यांनी समाज प्रबोधनपर मार्गदर्शन केले.यावेळी हभप आत्माराम कुडतडकर,हभप चंद्रकांत सुतार,हभप अशोक बोले, हभप दत्ताराम मांडवकर,गोविंद गोटेकर ,मोहन घडशी,देवजी सोनू भायजे,शंकर मायनाक, संदिप भायजे,अशोक बाबू गोटेकर,विलास मांडवकर,शांताराम रामू भायजे,सुनील भुवड,वसंत बारका गोटेकर,गणपत घडशी आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थितीत होते. असुर्डे निर्मळ वाडी येथील हरिपाठ यावेळी संपन्न झाला.
संगमेश्वर तालुका वारकरी संप्रदायाचे उपाध्यक्ष ह भ प नंदकुमार लिंगायत, खजिनदार हभप प्रदीप कानाल, बळीराज सेनेचे जिल्हाप्रमुख तानाजी कुळये, हरिश्चंद्र धावडे,प्रा.मधुकर थूळसर, जयदीप सुफल,दीपक शिगवण यांनी गोटेकर कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. हभप वै.शशिकला गोटेकर यांच्या पश्चात त्याने पती,मुलगा,मुली, सूना नातवंड असा परिवार आहे.












