▪️१६० वर्षांत प्रथमच स्वामीसुत महाराजांच्या पादुकांचे आगमन
▪️ महाप्रसाद मंडपाचे उत्साहात लोकार्पण
मसुरे | झुंजार पेडणेकर : श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान श्री क्षेत्र खोटले येथे
स्वामी सुत महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळा कार्यक्रम असंख्य स्वामी भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाचे औचित्य साधून चुनवरे गावाचे स्वामी भक्त श्री. प्रल्हाद रामचंद्र परब यांनी श्रद्धास्थान येथे देणगीदाखल दिलेल्या कायमस्वरूपी लोखंडी महाप्रसाद मंडप लोकार्पण सोहळा भारतीय साधू संत आखाडा अध्यक्ष महंत श्री मौनी महाराज (नागपूर), आत्मलिंग पादुका चेंबूर मठ मठाधीश श्री. विजय नलावडे यांच्या हस्ते झाला. या मंडप करिता कै. मधुसूदन वि. घाडीगावकर व कै. भगवान का. घाडीगावकर यांच्या स्मरणार्थ श्री. किशोर म.घाडीगावकर व श्री. कृष्णा भ. घाडीगावकर यांनी जागा विनामूल्य प्रदान केली त्याबद्दल आभार मानण्यात आले.
160 वर्षात प्रथमच श्री स्वामी समर्थ महाराज यांचे मानस पुत्र पू. स्वामीसुत महाराज यांच्या पादुकांचे आगमन श्री क्षेत्र खोटले येथे झाले.
मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथून भाविक दर्शना साठी आले होते. जेष्ठ स्वामी समर्थ साहित्यिक लेखक विवेक वैद्य, आध्यत्मिक अभ्यासक इतिहास तज्ञ् श्री. मिलिंद पिळगांवकर, विलीये गावचे प्रतिष्ठित नागरिक भाई तावडे आदी उपस्थित होते.
श्री श्री 108 महंत गावडे काका महाराज मुंबई येथे असल्याने त्यानी शुभेच्छा संदेश दिला.मान्यवरांचा सत्कार सोहळा झाला.
यावेळी मठाधीश श्री विजय नलावडे म्हणाले,
160 वर्षात प्रथमच स्वामी सुत महाराज यांच्या पादुका, श्रद्धास्थान खोटले मठात येणे हि तर स्वामी समर्थ महाराज यांची ईच्छा आहे. अनेक साधूसंत यांच्या पद स्पर्शने पावन झालेला हा खोटले मठ आहे. सदगुरु गावडे काका महाराज यांचे मौलिक मार्गदर्शन या मठाला नेहमी मिळत असते. चांगली सेवा करा, स्वामी निश्चित पाठीशी राहतील असे सांगितले.
हा सोहळ्याचे आयोजन स्वामी समर्थ श्रद्धास्थान, खोटले उत्सव समिती यांनी मठाधीपती श्री गणेश घाडीगावकर यांच्या मार्गदर्शनाने केले होते.
सूत्रसंचालन प्रसाद कसालकर व ऍड. प्रदीप मिठबावकर यांनी केले.
संगीत विशारद श्री सुंदर मेस्त्री यांच्या भजनाचा कार्यक्रम झाला.पादुका दर्शन सोहळ्या बरोबरच श्री. गणेश मेस्त्री मुंबई यांनी तयार केलेला श्री स्वामी सुत महाराज यांचा माहितीपट दाखविण्यात आला. त्या मुळे भाविकांना स्वामी सुत महाराज यांचेबद्दल अधिक माहिती समजू शकली. आभार मठाधीपती गणेश घाडीगावकर यानी मानले.












