लांजा येथे पार पडला मसाला पीक प्रात्यक्षिक व लाभार्थ्यांना मसाला पिकांची रोपे वाटप कार्यक्रम

आमदार किरण सामंत यांची प्रमुख उपस्थिती

संतोष कोत्रे
लांजा -: कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) रत्नागिरी अंतर्गत मसाला पीक प्रात्यक्षिक व लाभार्थ्यांना काळमिरी व दालचिनी या मसाला पिकांची रोपे वाटप कार्यक्रम नुकताच पार पडला.
काळे छात्रालय लांजा येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार किरण सामंत हे उपस्थित होते. तसेच पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर, तालुका कृषी अधिकारी अभिजीत शेलार, जिल्हा परिषद सदस्य संतोष रेवाळे, श्रीमती. विनिता गांगण, पंचायत समिती सदस्य शैलेश खामकर,उमेश पत्की, श्रीम. रसिका मेस्त्री, शिवसेनेचे राजापूर विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक मुन्ना खामकर आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित लाभार्थी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आल्यानंतर आमदार किरण सामंत यांच्या हस्ते लाभार्थ्यांना काळमिरी व दालचिनी या मसाला पिकांची रोपे वाटप करण्यात आली. यावेळी कृषी अधिकारी ताकृअ लांजा सुभाष गुरव, मंडळ कृषी अधिकारी लांजा १ संजय कदम, मंडळ कृषी अधिकारी भांबेड अनिल मोरे, तसेच सर्व उपकृषी अधिकारी, सर्व सहाय्यक कृषी अधिकारी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्रीम. गौरी शेरे उपस्थित होते.