आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे चौकशीचे आदेश!
प्रतिनिधी/ रोहन कांबळे
राधानगरी: राशिवडे येथील २० वर्षीय अथर्व निल्ले या तरुणाचा भोगावती येथील रत्ना क्लिनिक मध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अथर्वचा मृत्यू झाल्याचा आरोप अथर्वच्या आईवडिलांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,अथर्व याला ४ ऑगस्ट रोजी डेंग्यू झाल्याने भोगावती येथील डॉ.कातिवले यांच्या रत्ना क्लिनिक येथे उपचारासाठी दाखल केले होते.उपचारादरम्यान क्लिनिकमधील एका महिला कर्मचाऱ्याने अथर्वला इंजेक्शन दिले.त्यानंतर अथर्वला उलट्या सुरू झाल्या.मात्र डॉक्टरांनी वेळीच हस्तक्षेप न केरता अँटिडॉस न देता उपचारासाठी टाळाटाळ केली असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.पुढे त्याला मेट्रो हॉस्पिटल शाहूपुरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र दि.६ ऑगस्ट रोजी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या घटनेनंतर अथर्वच्या पालकांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली.घटनेची दखल घेत आबिटकर यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले.
त्यानुसार,तपासणीत त्रुटी आढळल्याने आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध पिंपळे यांच्या सूचनेनुसार डॉ.कातिवले यांचे रत्ना नर्सिंग होम हे हॉस्पिटल सील करण्यात आले.












