माझा गाव आरोग्य संपन्न गाव अंतर्गत चौके येथे उद्या आरोग्य शिबिर 

ग्रामपंचायत चौके- रोटरी क्लब मालवण-डॉ.लिमये हॉस्पिटल मालवण – प्राथमिक आरोग्य चौके यांचा सहभाग

 चौके l प्रतिनिधी :– माझं गाव आरोग्य संपन्न गाव याअंतर्गत चौके ग्रामस्थ मर्यादित महिला व पुरुष ग्रामस्थ यांच्यासाठी ग्रामपंचायत चौके-रोटरी क्लब मालवण डॉक्टर लिमये हॉस्पिटल मालवण- प्राथमिक आरोग्य केंद्र चौके यांच्या संयुक्त विद्यमाने चौके गाव मर्यादित BMD तपासणी शिबिर उद्या गुरुवार दिनांक १३ऑगस्ट २०२६ रोजी चौके सम्यकनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिर येथे सकाळी १०:३० ते सायं ४ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.

 

माझे गाव माझे आरोग्य संपन्न गाव या अंतर्गत शिबिरात मालवण येथील प्रतीक यश डॉक्टर लिमये हॉस्पिटल मालवण यांच्यावतीने चौके पंचक्रोशी मर्यादित ४० वयोगटावरील स्त्रिया व साठ वयोगटावरील पुरुषांकरिता सकाळी १०:३० ते सायंकाळी ४ वाजे पर्यंत BMD तपासणी केली जाणार आहे. ग्रामपंचायत चौके व प्राथमिक आरोग्य केंद्र चौके यांच्याकडून टेलेमेडिसिन गरजू रुग्णांना ECG व रक्त तपासणी या शिबिरात करण्यात येणार आहे.

 

राजा गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त चौके हायस्कूल १९९६ बॅच च्या वतीने डोळे तपासणी शिबिर –

 

चौके हास्कूलचे १९९६ दहावी बॅच चे माजी विद्यार्थी आणि चौके गावचे माजी सरपंच राजा गावडे यांच्या वाढदिवसाचनिमित्त त्यांच्या बॅच च्या मित्र परिवाराकडून विवेकानंद केयर हॉस्पिटल कणकवली यांच्यावतीने सकाळी १०:३० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत नेत्रतपासणी होणार आहे. तरी माझं गाव आरोग्य संपन्न गाव या शिबिराचा चौके गावातील ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन चौके ग्रामपंचायत यांच्यावतीने करण्यात आले आहे.