ऑक्टोबरमध्ये होणार भव्य सन्मान सोहळा
सावंतवाडी: मातृभूमी शिक्षण संस्था सावंतवाडीच्या ‘शिवसंस्कार’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि गुजरात या चार राज्यांत आयोजित करण्यात आलेल्या विविध ऑनलाईन स्पर्धांना आणि जिल्हास्तरीय श्री शिवचरित्र स्पर्धा परीक्षेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. या सर्व स्पर्धांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून यशस्वी विद्यार्थ्यांनी यात घवघवीत यश संपादन केले आहे.
बुधभूषण श्लोक पाठांतर स्पर्धेत लहान गटात बेळगावची शिवण्या नरेंद्रनाथ पाटील हिने प्रथम, संकेश्वरची स्फूर्ती विश्वास नलगे हिने द्वितीय, इचलकरंजीचा वीरेंद्र अजय छत्रे याने तृतीय आणि गोव्याच्या विराज गजानन पाटील याने उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. मोठ्या गटात वापीची पूर्वी भास्कर जाधव प्रथम, बेळगावची नुपूर बाबासो पाटील द्वितीय, सावंतवाडीचा श्रेयस हेमंत रेडकर तृतीय तर गोव्याचा विराज गजानन पाटील उत्तेजनार्थ ठरला. खुल्या गटात कल्याणच्या सौ. महिमा विनीत हर्षे यांनी प्रथम, गोव्याच्या सौ. रोशनी गजानन पाटील यांनी द्वितीय आणि गोव्याच्याच कु. श्रेया पाटील यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
‘श्री शिवराज्याभिषेक सोहळा’ या विषयावर झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत दोडामार्गची स्पृहा सुमित दळवी प्रथम, पुण्याची वनश्री गोसावी द्वितीय आणि छत्रपती संभाजीनगरचा प्रणित पाठक तृतीय आला. गोव्याची साईशा गिरीश फटनाईक आणि सावंतवाडीची प्रार्थना प्रणय नाईक यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. ‘शतकांच्या यज्ञातून उठली’ या गीतावरील समूहगीत गायन स्पर्धेत अहिल्यानगरचा सोहम वडके आणि साथीदार यांनी प्रथम, गोव्याच्या सुप्रिया शंकर देसाई आणि साथीदार यांनी द्वितीय तर नवी मुंबईच्या आत्मानंद ग्रुपने तृतीय क्रमांक मिळवला. दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. वीर बाजीप्रभू देशपांडे वेशभूषा स्पर्धेत सावंतवाडीचा अर्णव अभिजीत राऊळ प्रथम, फोंडा-गोव्याचा आयांश अभिजीत नाईक द्वितीय आणि चिपळूणची आश्लेषा नीरज महाडिक तृतीय ठरली.
जिल्हास्तरीय श्री शिवचरित्र स्पर्धा परीक्षा २०२५-२६ च्या निकालात सावंतवाडीच्या यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या कु. मुग्धा प्रशांत टोपले हिने ९५ गुणांसह प्रथम स्थान पटकावले. याच शाळेची कु. वेदा प्रवीण राऊळ ९४ गुणांसह द्वितीय आणि मळगाव इंग्लिश स्कूलची कु. मानसी प्रवीण डोंगरे ९३ गुणांसह तृतीय ठरली.
याशिवाय साईशा विजय खडपकर, स्वराली गजानन गवस, खुशी श्रीकृष्ण लातये, दुर्गाराम पवन कुडतरकर, करिष्मा पंकज मांजरेकर, संपूर्णा सुधाकर राऊळ, अन्वयी पवार, गौरी संतोष राऊळ, समिक्षा सचिन केसरकर, त्रिशा कृष्णाजी गावकर, उर्वी सिद्धेश मणेरीकर, लावण्या नंदकिशोर केसरकर, आर्या दिगंबर सारंग, स्वरा अनिल धुरी, स्वरा राजेंद्र देसाई, समृद्धी सहदेव गावडे, रिया अमोल जेवरे, मधुर अर्जुन पेंढुरकर, समृद्धी महादेव मडगावकर आणि मनस्वी उदय घारे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवून यश संपादन केले.
सर्व यशस्वी गुणवंत स्पर्धकांचे शिवसंस्कारच्या पदाधिकाऱ्यांकडून विशेष अभिनंदन करण्यात आले आहे. या सर्व विजेत्यांचा भव्य वार्षिक सन्मान सोहळा ऑक्टोबर २०२६ मध्ये पार पडणार असून त्याची निश्चित तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती संस्थाचालकांनी दिली आहे.











