स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा

बॅ. नाथ पै सभागृहात होणार दहावी व बारावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार 

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त इतर प्रबोधनात्मक विषयांची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांचे मनोरंजन व्हावे, या उद्देशाने पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी या इयत्तांतील विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

 

या स्पर्धेसह सावंतवाडी शहरातील सर्व शाळांमधील दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम १५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजता सावंतवाडी नगरपरिषदेच्या बॅ. नाथ पै सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

 

या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा श्रद्धा सावंतभोसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, मुख्याधिकारी विनायक आंधेर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती दिपाली भालकेर आणि उपसभापती सुनिता पेडणेकर यांनी केले आहे.