सावंतवाडीतील महिला व मुलींना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण
नावनोंदणीची अंतिम मुदत २० ऑगस्ट
हॉटेलिंग, केटरिंग व कुकिंग, फोर व्हीलर व टू व्हीलर, अॅडव्हान्स फॅशन डिझायनिंग सह विविध कौशल्ये प्रशिक्षण
सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीमार्फत शहरातील महिला व मुलींना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिलांना व मुलींना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने हॉटेलिंग, केटरिंग व कुकिंग, फोर व्हीलर व टू व्हीलर, अॅडव्हान्स फॅशन डिझायनिंग तसेच स्वसंरक्षणाच्या दृष्टीने सेल्फ डिफेन्स (कराटे) यांसह विविध प्रशिक्षणांचा यामध्ये समावेश आहे. हॉटेलिंग, केटरिंग व कुकिंग प्रशिक्षणामध्ये विविध प्रकारचे स्नॅक्स तसेच इतर खाद्यपदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच फोर व्हीलर व टू व्हीलर चालविण्याचे प्रशिक्षण, अॅडव्हान्स फॅशन डिझायनिंग आणि स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय सावंतवाडी शहरातील महिला व विद्यार्थिनींसाठी एम.एस.सी.आय.टी., संगणक व एआय तसेच कार्ड बनविण्यासारख्या विविध कौशल्यांचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या महिला व मुलींनी आपली नावे सावंतवाडी नगरपरिषद कार्यालयातील श्री. परवीन शेख यांच्याकडे नोंदवावीत. नाव नोंदणीची अंतिम मुदत २० ऑगस्ट २०२६ पर्यंत असून, शहरातील सर्व महिला व मुलींनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा श्रद्धा भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, मुख्याधिकारी विनायक आंधेरकर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती दिपाली भालकेर व उपसभापती सुनिता पेडणेकर यांनी केले आहे.












