ओटवणे येथील युवकाचे गोवा बांबूळी येथे उपचारा दरम्यान निधन.

ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे गावठणवाडी येथील रहिवासी आणी दशावतार कलावंत विठ्ठल गावकर यांचे सुपुत्र लाडू उर्फ विशाल विठ्ठल गावकर वय 29 याचे गोवा बांबूळी येथे उपचारादरम्यान अल्पशा आजाराने दुःख निधन झाले.अचानक तब्बेत बिघडली श्वास घेण्यात त्रास जाणवू लागल्याने दोन दिवसापूर्वी त्याला सावंतवाडी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते मात्र त्याच्यावर अधिक उपचारासाठी त्याला गोवा बांबूळी येथे नेण्याचा सल्ला देण्यात आला त्याच्यावर गोवा बांबूळी येथे उपचार सुरु होते मात्र रविवारी दुपारी त्याची तब्बेत खालावली आणि त्यातच त्याचे दुःखद निधन झाले. विशाल हा मेहनती आणि कष्टाळू होतो माजगाव उद्यमनगर येथे तो कामाला होतो मनमिळावू आणि सरळ साध्या स्वभावामुळे त्याचा मित्र परिवार ही मोठा होता त्याच्या जाण्याने गावकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या निधनाची बातमी समजताच दशावतार क्षेत्रातील, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या घरी धाव घेत गावकर कुटुंबियांचे सांत्वन केले.प्रसिद्ध दशावतार कलावंत विठ्ठल गावकर यांचा तो सुपुत्र तर युवा दशावतार सागर गावकर, भजनी बुवा मयूर गावकर यांचा तो जेष्ठ बंधू होय.त्याच्यावर अतिशय दुःखद वातावरणात येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्याच्या पच्छात वडील, आई दोनभाऊ,बहीण असा मोठा परिवार आहे.त्याच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.