कणकवलीकरांच्या सेवेत ‘रेवती वस्त्र’चे दालन दाखल

नगरसेविका सुप्रिया नलावडे यांच्या हस्ते शानदार शुभारंभ;

साऊथ इंडियन साड्या व फॅशनेबल ज्वेलरीची आकर्षक रेंज उपलब्ध

कणकवली :
फॅशन आणि सौंदर्याची नवी ओळख निर्माण करणारे उद्योजिका भारती परब-हेगडे यांचे ‘रेवती वस्त्र’ हे नवीन वस्त्रदालन कणकवलीकरांच्या सेवेत दाखल झाले आहे. पटवर्धन चौक येथील लक्ष्मी दत्त कॉम्प्लेक्स येथे नगरसेविका सुप्रिया नलावडे यांच्या हस्ते या दालनाचा शानदार शुभारंभ उत्साहात पार पडला.

‘रेवती वस्त्र’मध्ये कणकवलीकरांना आकर्षक साऊथ इंडियन साड्या तसेच फॅशनेबल ज्वेलरीचे विविध प्रकार एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. बदलत्या फॅशनच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन विविध प्रकारचे नवीन कलेक्शन ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे कणकवली शहरात फॅशनप्रेमींसाठी खरेदीचे नवे ठिकाण उपलब्ध झाले आहे.

यावेळी नगरसेविका सुप्रिया नलावडे, आर्या राणे, वरवडेच्या माजी सरपंच किशोरी परब, नंदू परब, मोहनदास हेगडे, भाई परब, सत्यवान परब, राजू मानकर, अशोक पुजारी, ममता पुजारी, रज्जू कंडियन, सिग्मी कंडियन, शिल्पा मानकर यांच्यासह भारती हेगडे यांच्या मित्रमंडळी व आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी ‘रेवती वस्त्र’च्या नव्या वाटचालीस शुभेच्छा देत व्यवसायाच्या भरभराटीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या. कणकवलीकरांनी या नवीन दालनाला आवर्जून भेट देऊन उपलब्ध असलेल्या आकर्षक कलेक्शनचा लाभ घ्यावा, असे आवाहन उद्योजिका भारती परब-हेगडे यांनी केले.