हेमलता बांदेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सौ. स्मिता आजगावकर यांचा सेवाभावी उपक्रम
मालवण | प्रतिनिधी : विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय, तळगाव येथे वॉटर प्युरिफायर संच भेट देण्यात आली. श्रीमती हेमलता शांताराम बांदेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सौ. स्मिता प्रकाश आजगावकर यांनी हा वॉटर प्युरिफायर संच शाळेला भेट दिला.
या वॉटर प्युरिफायर संचाचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ मुंबई माहिमच्या सदस्या सौ. रश्मी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत शाळेला आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक वातावरणासोबतच आरोग्यदायी सुविधा मिळणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने करण्यात आलेल्या या मदतीबद्दल शाळेच्या वतीने सौ. स्मिता प्रकाश आजगावकर यांचे आभार व्यक्त करण्यात आले.












