गांधीजयंतीनिमित्त पूज्य गांधी प्रतिष्ठान चिपळूणतर्फे जिल्हास्तरीय निबंध व वक्तृत्व स्पर्घा

चिपळूण (प्रतिनिधी) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या येथील ‘पूज्य गांधी प्रतिष्ठान चिपळूण’ या संस्थेच्या वतीने २ ऑक्टोबर या दिवशी गांधी जयंतीच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्हा स्तरावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. हे स्पर्धेचे पाचवे वर्ष आहे. चार गटांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी आकर्षण बक्षीसे ठेवण्यात आली असून बक्षीस वितरण गांधीजयंती दिनी नामवंत पाहुण्यांच्या हस्ते गांधारेश्वर येथील महात्माजींच्या समाधी समोर सकाळी ९ वाजता होईल.
स्पर्धेचा तपशील पुढीलप्रमाणे- निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे विषय समान असून गट व विषय पुढीलप्रमाणे- प्राथमिक गट (इ. ५ वी ते ७ वी) विषय, १) विद्यार्थी गांधीजी. २) गांधीजींचे बालपण. माध्यमिक गट (इ. ८ वी ते १०वी) विषय- १) गांधीजींचा वारसा २) मीठाचा सत्याग्रह, कनिष्ठ महाविद्यालयीन गट (इ. ११ व १२ वी) विषय- १) गांधीजींचे सहकारी, २) गांधीजींचा सत्याग्रह. वरिष्ठ महाविद्यालयीन व खुला गट विषय, १) गांधीजींचा सर्वधर्मसमभाव. २) आजचे जग आणि गांधीजी. वरील स्पर्धेसाठी गटवार बक्षिसे तसेच सर्व सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येईल. ही स्पर्धा रत्नागिरी जिल्हा स्तरावरील असून मराठी, हिंदी किंवा इंग्रजी या पैकी एका भाषेत सहभाग घेता येईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
स्पर्धेचे नियम- निबंध स्पर्धेसाठी शब्दमर्यादा प्राथमिक गट-३०० शब्द. माध्यमिक गट-४०० शब्द. कनिष्ठ महाविद्यालयीन गट-६०० शब्द. वरिष्ठ महाविद्यालयीन व खुला गट-८०० शब्द. तर वक्तृत्व स्पर्धेसाठी वेळ मर्यादा प्राथ.गट-३ मिनिटे. माध्य.गट-४ मिनिटे. कनिष्ठ महाविद्यालयीन गट-६ मिनिटे. वरिष्ठ महाविद्यालयीन व खुला गट-७ मिनिटे. निबंध पाठवताना आपले नाव, इयत्ता, शाळेचे नाव व फोन नंबर न विसरता लिहावे. निबंध शनिवार १२ सप्टेंबरपर्यंत पाठविणे. तसेच वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनीही आपली नावे शनिवार दि. १२ सप्टेंबर पूर्वी द बुकलँड, परकार काँम्प्लेक्स शेजारी बाजारपेठ चिपळूण या पत्त्यावर पाठवावीत व बुकलँड चिपळूण (९८२२९८०६९५) व प्रा. विनायक होमकळस (८८८८६५७७६७) वर कळविणे आवश्यक आहे.
वक्तृत्व स्पर्घा रविवार दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता चिपळूणमधील परांजपे मोतीवाले हायस्कूल येथे घेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी प्रा. विनायक होमकळस (८८८८६५७७६७), जाफर गोठे (९९६०४८९८६२), सुनिल खेडेकर (९४२०१५६७९७) या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन गांधी प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.