आडाळी एमआयडीसी प्रश्नांबाबत उदया लॉगमार्च होणार
सर्वपक्षीय नेत्याचा पाठींबा !!
दोडामार्ग सुहास देसाई
राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आडाळी एमआयडीसी बाबत आडाळी ते बांदा असा लॉगमार्च उद्या काढण्यात येणार असून नियोजीत वेळेत सकाळीं ९.३० वाजता निघणार आहे त्यांनतर बांदा येथे वस्तुस्थिती सर्वा समोर मांडली जाईल हे आंदोलन प्रतीकात्मक मत्रालयाच्या दिशेने जायला पाहिजे अनेक उद्योग येऊन स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे यासाठी असून अनेकांना आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी दिली जाणार आहे त्याच बरोबर येथे कोणाला निवेदनही दिले जाणार नाही फक्त रोजीरोटी भाकरीचा प्रश्न असल्याने जन भावना शासनकर्त्या पर्यंत पोहचवा हाच उददेश असल्याचं आडाळी स्थानिक कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत सांगितले
यावेळी कृती समितीचे अध्यक्ष पराग गावकर सचिव प्रविण गावकर घुगुरगाठी संस्थेचे अध्यक्ष सतिश लळीत आदी उपस्थित होते पराग गावकर यांनी सांगितले की दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसी व्हावी यासाठी तत्कालीन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री ना. नारायण राणे यांनी सन २०१३मध्ये मजुरी दिली त्यांनंतर म्हणावा तसा प्रतिसाद लाभला नाही याबाबतीत आम्हीं स्थानिकांनी आवाज उठविला त्यांनतर प्रशासनानं बैठका घेऊन काही बाबतींत निर्णय घेतले तसेच वेळोवेळी आश्वासने देऊन फसवणुक केली त्यामुळे या भागात उद्योग आले नाही दहा वर्षात म्हणावा तसा विकास व कामांना प्राधान्य देण्यात आले नाही त्यामुळे रोजगार निर्मिती होऊ शकली नाही त्यामुळे जनभावना लक्षात घेऊन तालुक्यातील रोजीरोटी व भाकरी चां प्रश्न असल्याने मोठा प्रतीसाद तालुक्यात युवकांतून मिळत आहे गेलीं चार वर्षे प्रशासन मंत्री महोदय बैठका घेऊन फक्त आश्वासने दीलेली हवेत विरली आहे लॉगमार्च हा पहिला टप्पा असल्याने मोठा वर्ग सहभागी होणार आहे रोजगाराचा प्रश्न भेडसावत असल्याने युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन पराग गावकर यांनी केले आहे












