अनधिकृत वाळू वाहतूक करणारे ६ डंपर पकडले

स्थानिक नागरिकांच्या मदतीने तहसील व मालवण पोलिसांची संयुक्त कारवाई

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील सागरी महामार्ग येथे हॉटेल आराध्य नजिक शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास तहसिलदार मालवण व पोलिस निरीक्षक मालवण यांनी नेमलेल्‍या संयुक्‍त पथकाने अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या गोवा पासिंगच्या सहा डंपरवर धडक कारवाई केली आहे.

मालवण सागरी महामार्गावर हॉटेल आराध्‍य नजीक २६ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजण्याच्या दरम्यान डंपरमधून अनधिकृत गौणखनिज (वाळू) ची बेकायदेशीर वाहतूक करण्‍यात येत असल्याने नगरसेवक मंदार केणी, वैभव मयेकर, मंगेश गोवेकर व अन्य काही उपस्थितत यांनी डंपर पकडले व प्रशासनास माहिती दिली.

दरम्यान मिळालेल्या माहितीच्‍या आधारे पोलीस निरीक्षक मालवण यांच्या पथकामार्फत त्या ठिकाणी येत डंपरची तपासणी केली असता वाहनामध्‍ये वाळु आढळून आली. सध्‍या वाळु वाहतुक करण्‍याची कोणत्‍याही प्रकारची अधिकृत परवानगी दिलेली नाही. सदरच्‍या वाहनात अनधिकृत गौण खनिज (वाळु) असल्‍याने त्‍याबाबतची माहिती पोलिस निरीक्षक मालवण यांनी तहसिलदार मालवण यांना दिली. त्‍यानंतर तहसिलदार मालवण यांच्‍या सूचनांनुसार घटनास्‍थळी महसूल पथक उपस्थित झाले. पुढील कारवाईसाठी तहसिलदार कार्यालय मालवण यांच्‍या आवारात लावण्‍यात आले आहेत. पुढील कायदेशीर कारवाईसाठी डंपर (जीए-०९-यू-०६३९). (जीए-०९-यू-२९७९). (जीए-०९-यू-३४५५) (जीए-०१-टी-८७१९). (जीए-०९-यू-०४५१). (जीए-०८-व्ही-१७३४) तहसील कार्यालय मालवण येथे ठेवण्यात आले आहेत.