ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे सातेरी रवळनाथ मंदिरात सामाजिक कार्यकर्ते बबलू गावकर यांच्या वतीने ,सातेरी रवळनाथ देवस्थान कमिटी, ओटवणे यांच्या सहकार्यातून शनिवार १५ ऑगस्ट रोजी सलघुरुद्र अभिषेक तसेच पत्रकार दीपक गावकर यांच्या वतीने सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे.मंदिरात सकाळ पासूनच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. सकाळी ९. ०० वा. लघुरुद्र अभिषेक, १०.३० सत्यनारायण महापूजा(पत्रकार दीपक गावकर) यांच्या वतीने,१२. ३० वा. श्री रवळनाथ आरती, दुपारी १. ०० वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रात्रौ ठीक ८. ०० वाजता प्रसिद्ध बुवा मयूर गवळी यांचे तसेच रात्रौ ९. ३० वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ सरमळे (बुवा – संजय गावडे )यांचे भजन होणार आहे.सातेरी रवळनाथ मंदिरात श्रावण महिन्यातील या पहिल्या धार्मिक कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान कमिटी, पूजेचे मानकरी दीपक गावकर, सामाजिक कार्यकर्ते बबलू गावकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.












