गोळप येथील नदीत बूडून 12 वर्षीय मुलाचा दुदैवी मृत्यु

 रत्‍नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील गोळप येथील नदीत बूडून 12 वर्षीय मुलाचा दुदैवी मृत्‍यू झाला. ही घटना गुरुवार 13 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गोळप परिसरावर शोककळा पसरली आहे. याबाबत पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्‍यूची नोंद करण्यात आली आहे.
आर्यन संतोष पालकर (12,रा.गोळप पंचशील,रत्‍नागिरी) असे नदीत बुडून मृत्‍यू झालेल्या मुलाचे नाव आहे. आर्यन हा सहवीत शिकत होता. गुरुवारी शाळेतून घरी आल्यानंतर सायंकाळी 5.30 वा.सुमारास तो मित्र सार्थक पालकरसोबत घराजवळील नदीवर पोहण्यासाठी गेला होता. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने आर्यन पाण्यात बुडू लागला. त्‍याने आरडा-ओरडा करताच त्‍याचा आवाज ऐकून आजुबाजुच्या नागरिकांनी नदीच्या दिशेने धाव घेतली. काहा नागरिकांनी नदी उड्या घेतल्या सायंकाळी 6.30 वा.सुमारास आर्यनला नदीतून बाहेर काढून तातडीने जिल्हा शासकिय रुग्णलयात दाखल करण्यात आले. परंतू रात्री 9.20 वा.सुमारास वैद्यकिय अधिकाऱ्यांनी आर्यनला तपासून मृत घोषित केले. अवघ्या 12 वर्षांच्या आर्यनचा मृत्‍यू झाल्यामुळे पालकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून,गोळप परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.