ओरी येथे बंगल्याच्या टेरेसवरून पाय घसरुन पडलेल्या वृध्दाचा मृत्यू

रत्‍नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील ओरी येथे बंगल्याच्या टेरेसची साफसफाई करत असताना पाय घसरुन जमिनीवर पडलेल्या वृध्दाचा जिल्हा शासकिय रुग्णालयात आकस्मिक मृत्‍यू झाला. ही घटना शनिवार 15 ऑगस्ट रोजी दुपारी 1.45 वा.सुमारास घडली.
संतोष बाळकृष्ण देसाई (58,रा.मौजे ओरी,रत्‍नागिरी) असे आकस्मिक मृत्‍यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे. याबाबत विनिता विजय साळवी यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्‍यानुसार, शनिवारी सकाळी संतोष देसाई हे आपल्या बंगल्याच्या टेरेसची साफसफाई करत होते. त्‍यावेळी तेथील शेवाळीवरुन त्‍यांचा पाय घसरल्यामुळे ते टेरेसवरुन खाली जमिनीवर पडले. त्‍यांच्या डोक्याला गंभिर दुखापत झाल्यामुळे त्‍यांना तातडीने उपचारांसाठी रत्‍नागिरी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्‍यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्‍यूची नोंद करण्यात आली आहे.