शिरोडा येथील डिझेल कोर्सचा १००% निकाल..

वेंगुर्ले : प्रतिनिधी : क्षात्रकूलोत्पन्न मराठा समाज मुंबई संचालित के.एम.एस. डॉ. शिरोडकर कौशल्य विकास संस्था, शिरोडा कॉलेज च्या ‘डिझेल मेकॅनिक” या कोर्सचा १०० % निकाल लागला आहे.
यामध्ये प्रथम क्रमांक कु.सिद्धेश दशरथ परब ८६.८३ %, द्वितीय क्रमांक कु.गोकुळदास प्रकाश सावंत ८०.५०%, आणि तृतीय क्रमांक कु.राजाराम वासुदेव घोगळे ७८.००% गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. सर्व विद्यार्थी यांना श्री.शिरगांवकर सर व श्री.कासार सर यांनी मार्गदर्शन केले.
क्षा.म.समाज मुंबई अध्यक्ष व सरचिटणीस , विश्वस्त,नियंत्रण समिती ,कार्यकारी मंडळ ,पालक समिती, सहाय्यक कार्यकारी अधिकारी व पदाधिकारी यांच्यातर्फे उत्तीर्ण विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.