चिपळूण (वार्ताहर) : मिरजोळी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, दलवाई हायस्कूल, मिरजोळी येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक रोहित जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली.
यावेळी वंदे मातरम राष्ट्रगीत, राज्य गीत व ध्वजगीताने वातावरण देशभक्तिमय झाले. या कार्यक्रमाला नियामक मंडळाचे चेअरमन खलील दलवाई, विश्वस्त अशोक नलावडे, भाई नलावडे, सचिव जहिर दलवाई, प्राथमिक विभाग शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश जाधव, खजिनदार रामचंद्र महाडिक, मंगेश चव्हाण, जमिल दलवाई, माध्यमिक विभाग शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विहार पवार उपाध्यक्ष गौरी सैतवडेकर, बालाजी पुलचवाड व प्रशालेचे सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त दहावी शालांत परीक्षा २०२६ मध्ये गुणवत्ता प्राप्त श्रुती बालाजी पुलचवाड, कौस्तुभ देवरुखकर, सानवी शिर्के, आंब्रे सुरुची, दिशा भुवड, ऋषभ सकपाळ, रिया पवार, वेदिका महाडिक, नेहा तटकरे, श्रद्धा कदम व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सन २०२६ इयत्ता पाचवी कुमार वेद माळी इयत्ता सातवी मिहीर भुवड माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा कुमार प्रथम जाधव विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांच्या यशाचे कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्याध्यापकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे सहसचिव राजेश जाधव व विश्वस्त अशोक नलावडे यांनी मार्गदर्शनपर भाषण केले कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून स्वातंत्र्य दिनाचा उत्साह द्विगुणित केला. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रप्रेम आणि देशसेवेची भावना जागृत करणाऱ्या संदेशाने करण्यात आला.












