चिवेली विद्यालयात माजी सैनिक मुकुंद साळुंके यांचा सन्मान

चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील चिवेली पंचक्रोशी विकास मंडळ संचलित आदर्श विद्यामंदिर, चिवेली या विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त सैनिक व विद्यालयाचे माजी विद्यार्थी मुकुंद साळुंके व स्कुल कमिटी चेअरमन संतोष कुळे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
शाखा समिती अध्यक्ष सुभाष शिर्के, मुख्याध्यापक संजय चव्हाण यांच्याहस्ते मुकुंद साळुंके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी संगीतावर आधारित लेझीम कवायत, राष्ट्रभक्तिपर गीत गायन सादर केले. तसेच कु. हर्षांगी जुवळे हिने देशभक्तीपर आधारित नृत्य सादर केले. यावेळी निवृत्त जवान मुकुंद साळुंके यांनी देशासाठी एकत्र येण्याचे आवाहन करत ‘ नेशन फर्स्ट ‘ चा संदेश दिला.याप्रसंगी विद्यालयात ‘ हर घर तिरंगा ‘ उपक्रमांतर्गत आयोजित चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, १०० मीटर, २०० मीटर व पाचशे मीटर धावणे स्पर्धा आदी स्पर्धाचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शाखा समिती अध्यक्ष सुभाष शिर्के, मुख्याध्यापक संजय चव्हाण, शाळा समिती सदस्य दयानंद कदम, शिक्षक नितीन गुरव, रियाज अत्तार, अक्षय साळवी, संदीप शिर्के, मोहन गुजर, मुकुंद जाधव, सलीम मुल्लाजी, वीरेंद्र शिर्के, अविनाश बामणे, जुबेर परकार, सुहास साळवी, अक्षय शिबे, शांताराम हुमणे, योगेश लाड, साहिल साळवी, मनीष साळवी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन रियाज अत्तार यांनी केले तर आभार नितीन गुरव यांनी केले.