आमदार निलेश राणे यांनी पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांची घेतली भेट 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध पर्यटनविषयक प्रश्नांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा : आमदार दिपक केसरकर यांचीही उपस्थिती 

मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांनी मुंबई येथे महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांची मेघदूत निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला अधिक चालना देणे, नव्या पर्यटन सुविधा निर्माण करणे तसेच जिल्ह्यातील विविध पर्यटनविषयक प्रश्नांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली. यावेळी माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर उपस्थित होते.