भोम महादेवराव शिर्के विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात

चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील यशवंत शिक्षण संस्था, भोम या संस्थेच्या महादेवराव शिर्के माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय शिर्के यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्था अध्यक्ष प्रकाश शिर्के, संचालक सचिन चव्हाण, सचिव प्रशांत शिर्के, भोम साईसेवा प्रतिष्ठान माजी अध्यक्ष राजेश चव्हाण, राकेश चव्हाण, निवृत्त पोलीस अधिकारी विलास भोसले, भोम प्रतिष्ठित शेतकरी जयसिंग चव्हाण, माजी सैनिक सखाराम चव्हाण, शाळेचे माजी नाईक, भोम नागरिक कृष्णा चव्हाण, साईभक्त नंदू चव्हाण, भोम पंचक्रोशीतील अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते.
विद्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून यशवंत शिक्षण संस्था, भोम व भोम साईसेवा प्रतिष्ठान श्री साई मंदिर भोम, प्रतिष्ठित व्यावसायिक, नागरिक,मान्यवरांच्या हस्ते गरजू, हुशार, गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य वाटप करण्यात आले. यावेळी भोम साईसेवा प्रतिष्ठान श्री साई मंदिर भोम कडून दत्तक घेतलेल्या कु. देविका बने व कु स्नेहल तामुंडकर या दोन विद्यार्थिना शिक्षणासाठी श्री साई शिष्यवृत्तीची घोषणा करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष प्रकाश शिर्के यांना या दोन विद्याथीनींचा चेक सुपूर्द करण्यात आला. साई प्रतिष्ठानच्या शालेय साहित्य व शिष्यवृत्तीसाठी विद्यालय शिक्षक श्री गणेश सोनवणे यांनी प्रयत्न केलेत. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री तानाजी कांबळे यांनी श्री प्रतिक शिर्के दोणवली याजकडून सदर कार्यक्रमासाठी मदत मिळवली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेतून तानाजी कांबळे यांनी विद्यालयातील विविध उपक्रम व स्वातंत्र्यदिनाचे महत्व विषद करत यशवंत शिक्षण संस्था, भोम व श्री साई मंदिर भोम तसेच प्रतिक शिर्के आदी दानशूर व्यक्तीबद्दल सुतोवाच केले. शिक्षक संभाजी कुरुंद यांनी भारत शोध, ब्रिटीश, नबाब, पोर्तुगीज, डच यांचा हस्तक्षेप, स्वातंत्र्य लढा, चळवळ आदी बाबतीत आढावा घेतला. भोम परिसरातील सामाजिक कार्यकर्ते नंदू चव्हाण यांनी भोम साईसेवा प्रतिष्ठान श्री साई मंदिर भोम यांचे गरजू, हुशार,गरीब, होतकरू मुलांसाठी स्तुत्य शैक्षणिक उपक्रम आहे असे सांगितले. भोम साईसेवा प्रतिष्ठान अध्यक्ष राजेश चव्हाण, राकेश चव्हाण भोम शेतकरी जयसिंग चव्हाण, माजी सैनिक सखाराम चव्हाण, भोम नागरिक कृष्णा चव्हाण यांचा संस्था अध्यक्ष प्रकाश शिर्के, यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, बुके देऊन संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी संस्था अध्यक्ष प्रकाश शिर्के, मुख्यकार्यकारी अधिकारी संजय शिर्के, संचालक सचिन चव्हाण, सचिव प्रशांत शिर्के, राजेश चव्हाण, राकेश चव्हाण जयसिंग चव्हाण, माजी सैनिक सखाराम चव्हाण, निवृत्त पोलीस अधिकारी विलास भोसले, शाळेचे निवृत्त नाईक कृष्णा चव्हाण, व्यापारी दिनेश इंगवले, व्यावसायिक नंदू चव्हाण, जयंत चव्हाण, विजय साळुंखे, मंदार चव्हाण, भोम पंचक्रोशीतील अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते. स्वातंत्र्यदिन कार्यक्रमासाठी संगीतमय कवायत व प्रात्यक्षिकसाठी क्रीडा शिक्षक मुकुंद पोटभरे व ज्ञान प्रबोधिनी शिक्षक, प्रशिक्षक स्वप्नील आंबेडे यांनी मार्गदर्शन केले. सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
या निमित्त विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चिपळूण हब ज्ञान प्रबोधिनीतील विभागस्तरावरील मेडल, चषक, सन्मान गदा, आदी यांची मांडणी करण्यात आली. यावेळी मान्यवरांची वाहवा विद्यार्थ्यांनी मिळवली. भोम साईसेवा प्रतिष्ठान श्री साई मंदिर भोम कडून सर्व विद्यार्थ्यांना जिलेबी देण्यात आली. भोम लालबाग व्यावसायिक, विद्यालयाचा माजी विद्यार्थी श्रीकांत कदम यांनी सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक धनाजी देसाई यांनी तर उपस्थितांचे आभार व वृत्त शब्दांकन शिक्षक गणेश सोनवणे यांनी केले.