सिंधुदुर्गच्या विकासाला ‘ताज’ची झळाळी
पर्यटन विकासाला नवी भरारी
पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांचे विशेष कौतुक
जागतिक पर्यटनाची द्वारे खुली होणार
अमित खोत | मालवण : सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाला मोठी चालना देणाऱ्या वेंगुर्ला शिरोडा येथील ‘ताज’ प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चा मालवणच्या वतीने जल्लोष करण्यात आला. महायुती सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांबद्दल आभार व्यक्त करत युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
वेंगुर्ला शिरोडा येथे ‘ताज’सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन ब्रँडच्या माध्यमातून सिंधुदुर्गच्या पर्यटनाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय, स्थानिक रोजगार आणि विविध पूरक उद्योगांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
सिंधुदुर्गच्या पर्यटन क्षमतेला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांचे भाजपा युवा मोर्चाच्या वतीने विशेष कौतुक करत आभार मानण्यात आले.
महायुती सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला गती मिळत असून आगामी काळात सिंधुदुर्ग पर्यटनाच्या नकाशावर आणखी ठळकपणे झळकेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
‘ताज’ प्रकल्पाच्या माध्यमातून सिंधुदुर्गच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याने हा आनंदाचा क्षण आहे,’ अशी भावना व्यक्त करत भाजपा युवा मोर्चा मालवणच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत महायुती सरकार व पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले.
यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राकेश सावंत, जिल्हा कार्यकारिणी सदस्य तथा नगरसेवक ललित चव्हाण, युवा मोर्चा मालवण अध्यक्ष सुमित सावंत, सुशील गावडे, हेमंत शिरगांवकर, बबलू राऊत यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
▪️ अमित खोत | मालवण













