दापोलीच्या राजाचे पाटपूजन उत्साहात; हिंदू राज मित्र मंडळाची मनोरे रचून सलामी

दापोली : 
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत गणेशोत्सवाच्या तयारीला उत्साहात सुरुवात झाली आहे. ओम साई गणेश मित्र मंडळाच्या वतीने ‘दापोलीच्या राजा’चे पाटपूजन धार्मिक वातावरणात पार पडले. विधिवत पूजा-अर्चा करत गणरायाचे पाटपूजन करण्यात आले. यावेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. विशेष आकर्षण ठरले ते हिंदू राज मित्र मंडळ, सातारा यांच्या मनोरे रचण्याच्या सलामीचे. पारंपरिक पद्धतीने मनोरे रचून गणरायाला मानवंदना देण्यात आली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमाला गणेशभक्त आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भक्ती, उत्साह आणि पारंपरिक संस्कृतीचा संगम या पाटपूजन सोहळ्यात पाहायला मिळाला.