मालवण नगरपरिषद स्वच्छता व आरोग्य विभागाची बांगीवाडा येथे रात्री कारवाई
मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपरिषद आरोग्य व स्वच्छता विभागाने मंगळवारी रात्री उशिरा शहरातील बांगीवाडा येथे कारवाई करुन ५ हजाराचा दंड वसूल केला. इरशाद रफतुल्ला खान यांनी प्लास्टिक व टायर जाळल्या प्रकरणी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास स्वच्छता विभागाने ही कारवाई केली. स्वच्छता निरीक्षक संजय पवार व मुकादम बाळकृष्ण जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
प्रतिबंधित प्लास्टिक विक्री व साठा याबाबतही मालवण नगरपरिषद प्रशासनाची कारवाई सुरु आहे. अनेक ठिकाणी कारवाई करून प्रतिबंधित प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच दंड ही वसुल करण्यात आला आहे. त्यासोबतच मोठया प्रमाणात प्लास्टिक जाळून प्रदूषण निर्माण केल्या प्रकरणी पालिका प्रशासनाने कारवाई केली आहे.
फोटो : प्लास्टिक व टायर जाळल्याप्रकरणी मालवण नगरपरिषद स्वच्छता व आरोग्य विभागाने बांगीवाडा येथे कारवाई केली. (अमित खोत, मालवण)












