दिव्यांग जनकल्याण संस्थेचा दुसरा वर्धापन दिन २१ ऑगस्ट रोजी

लांजा (प्रतिनिधी) : दिव्यांग बांधवांच्या विविध समस्यांसाठी कार्यरत असलेल्या दिव्यांग जनकल्याण संस्थेचा २ रा वर्धापन दिन २१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता कुलकर्णी काळे छात्रालय लांजा च्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
या वर्धापन दिन कार्यक्रमांतर्गत सकाळी दिव्यांग सभासद बांधवांची नोंदणी, दिव्यांगांच्या विविध समस्यांबाबत नोंदणी अर्ज, तर दुपारी संस्थेचा दुसरा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यावेळी दिव्यांग तसेच सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.
संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष संजय सुर्वे, उपाध्यक्ष किरण धनावडे, सचिव मयूर जाधव, खजिनदार संतोष धुमक यांच्यासह सर्व पदाधिकारी मेहनत घेत आहेत