मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा
कार्यकर्त्यांकडून भव्य पुष्पहार अर्पण
सावंतवाडी : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन कार्यक्रमात भव्य केक कापून तसेच मला मोठा पुष्पहार अर्पण करून संजू परब यांना वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी मंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी आमदार राजन तेली,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा माजी जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, महिला आघाडी प्रमुख ॲड. नीता सावंत कविटकर, प्रेमानंद देसाई,माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख बबन राणे, दिनेश गावडे, आनंद शिरवलकर, जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर, पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव, नगरसेवक अजय गोंदावळे, सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ, सैनिक पतसंस्थेचे चेअरमन प्रल्हाद तावडे, सुनील डुबळे, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, जिल्हा बँक संचालक विद्या परब, उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस, परीक्षित मांजरेकर, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, माजी नगरसेवक गुरुदास मठकर, मकरंद तोरस्कर, क्लेटस फर्नांडिस, आबा केसरकर, सुजित कोरगावकर, चंदन नाईक, समीर पालव, उद्योजक अतुल नाखरे, चंदन धुरी यांसह शिवसेना व महायुतीचे पदाधिकारी विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते
तसेच नागरिकांनी व ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी प्रत्यक्ष भेटून तसेच फोन द्वारे संजू परब यांना वाढदिवसाचे अभिष्टचिंतन केले.













