राजापुरातील हर हर महादेव मित्र मंडळाच्या वतीने राजापूर ते कुणकेश्वर पदयात्रा

शनिवार २२ ते सोमवार २४ आगस्ट कालावधीत निघणार पदयात्रा
मंडळाचे पदयात्रेचे १२ वर्षे
राजापूर प्रतिनिधी : हर हर महादेव मित्र मंडळ राजापूर यांच्या वतीने या वर्षीही दुसऱ्या श्रावण सोमवारी २४ ऑगस्ट रोजी श्री देव कुणकेश्वर दर्शनासाठी राजापूर ते कुणकेश्वर अशी पदयात्रा काढण्यात येणार आहे. मंडळाचे पदयात्रेचे हे बाराव वर्ष असून या पदयात्रेत सुमारे शंभर भक्तगण सहभागी होणार आहेत. शनिवारी २२ ऑगस्ट ते सोमवार २४ ऑगस्ट असा तीन दिवसांचा या पदयात्रेचा कार्यक्रम होणार आहे.
शनिवारी २२ ऑगस्ट रोजी सकाळी सकाळि ७.३० वाजता या पदयात्रेला प्रारंभ होणार आहे. जवाहर चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला महाराजांच्या पूष्पहार अर्पण करून या पदयात्रेचा शुभारंभ होणार आहे. त्यानंतर राजापूर ते पुढे शेढे येथे अल्पोपपहार, तेथून पुढे येथे रामूशेठ पेडणेकर यांचे वतीने मयेकर मांगर येथे भाविकांना अल्पोपहार तेथून पूढे पडेल कॅंटिंग यथे चहा नाष्टा व रात्री ८ वाजता पडेल पुढे वाडा येथे श्री देव रवळनाथ मंदिरात मुक्काम. या ठिकाणी रात्रीचे जेवण वाडा ग्रामस्थ परब तसेच वाडेकर बंधूनकडून केली जाणार आहे.
रविवार २३ ऑगस्ट रोजी सकाळी ७. ३० वाजता वाडा येथे अल्पोहार घेऊन पूढे कूणकेश्वरकडेप प्रयाण. दुपारी २ वाजता ही पदयात्रा कुणकेश्वर येथे पोहचणार आहे. या ठिकाणी श्री. तेली बंधूंकडून भाविकांना जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे. तर २४ रोजी सोमवारी सकाळी मंदिरात काकाड आरती व पुजा अभिषेक कार्यक्रमात सहभागी होणार, याच वेळी श्री देव कुणकेश्वर मंदिरात या पदयात्रेतील भाविकांना सकाळी ८ ते ९ या वेळेत भजन करण्याची संधी देण्यात आलेली असून या ठिकाणी पदयात्रेत सहभागी असणारे श्री. बाईत मंडळींचे ढोलावरच भजन होणार आहे. त्यानंतर प्रसाद घेऊन भाविकांचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे.