स्वरा अमोल मेस्त्री २२० गुणांसह शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत ११८ वी
लांजा ( प्रतिनिधी) :इयत्ता चौथीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद शाळा लांजा आगरवाडीचा निकाल १००% लागला असून
स्वरा अमोल मेस्त्री हिने २२० गुणांसह शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत ११८ वा क्रमांक पटकावला.
शिष्यवृत्ती परीक्षेत आगरवाडी शाळेने उज्ज्वल परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे. परीक्षेस बसलेले तिन्ही विद्यार्थी पैकी सर्व पात्र व एक शिष्यवृत्तीधारक ठरल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. यामध्ये कु. स्वरा अमोल मेस्त्री २२० गुण मिळवले.(शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत ११८ वा क्रमांक). तसेच कु. अवनी प्रज्योत रामाणे – १९२ गुण, राज राजेश रांबाडे – १८२ गुण मिळवले.
. शाळेच्या या यशाबद्दल
गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग, केंद्र समन्वयक श्रीमती पेणकर , मुख्याध्यापक संतोष वारंग शिक्षक दिनेश झोरे , वाडीप्रमुख प्रमोद आगरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. अर्चना बापेरकर, उपाध्यक्ष राजेश आगरे, अंगणवाडी ताई श्रीमती तोडकरी, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, पालक व आगरवाडी ग्रामस्थ यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.













