चिपळूण (प्रतिनिधी) : रिगल आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै २०२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. रिगल आयटीआयचा १०० टक्के निकाल लागलेला आहे. या यशामुळे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्याने विद्यार्थी, पालक आणि संस्थेच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रिगल आयटीआयमध्ये इलेक्ट्रिशियन या विभागात प्रथम क्रमांक कु. वेदिका रणजित पानगले ९२.१७ टक्के, द्वितीय क्रमांक कु. ऋषिकेश कृष्णा म्हादे ८६.५० टक्के आणि तृतीय क्रमांक कु. आकांक्षा गजानन पवार ८५.३३ टक्के यांनी मिळविले आहे. तर सिव्हील ड्राफ्ट्समन या विभागात प्रथम क्रमांक कु. अरबाझ जबीर सुर्वे ९२ टक्के, द्वितीय क्रमांक कु. सात्विकता संजय मढव ८४.६७ टक्के आणि तृतीय क्रमांक कु. मनीष अविनाश पवार ७९.५० मिळवला आहे. कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट (कोपा) या विभागात प्रथम क्रमांक कु. पवन सिताराम शिगवण ८४.८३ टक्के आणि द्वितीय क्रमांक कु. असद रिझवान खान ७२.१६ टक्के यांनी मिळविले आहे. वेल्डर या विभागात प्रथम क्रमांक कु. प्रियांका महादेव मोरे (सौ. नेहा निशिकांत जाधव) ७० टक्के यांनी मिळविले आहे. या विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास, प्रात्यक्षिक प्रशिक्षण आणि मेहनतीच्या जोरावर हे उल्लेखनीय यश मिळविले. विद्यार्थ्यांच्या या यशामागे संस्थेतील अनुभवी शिक्षक व निदेशकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, आधुनिक प्रशिक्षण पद्धती आणि संस्थेच्या व्यवस्थापनाचे नियोजन यांचा मोलाचा वाटा आहे. १०० टक्के निकालामुळे रिगल आयटीआयच्या गुणवत्तापूर्ण व्यावसायिक शिक्षणावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्याच्या आधारे रोजगार व स्वयंरोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या मेहनतीला संस्थेतील प्रशिक्षक व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. नियमित प्रशिक्षण, प्रात्यक्षिक सराव आणि योग्य मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केली. तसेच सर्व विद्यार्थ्यांना लोटे एम.आय.डी.सी., गाणे खड्पोली एम.आय.डी.सी., पुणे व मुंबई येथे अप्रेन्टीसशीप मिळालेली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेच्या व्यवस्थापनाने, प्राचार्य अभिराज कबीर तसेच शिक्षक व प्रशिक्षकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देताना संस्थेने “कौशल्य, गुणवत्ता आणि यश” ही वाटचाल यापुढेही कायम ठेवण्याचा विश्वास व्यक्त केला.













