कट्टा येथे आदर्श महसूल कर्मचारी

योगेश वेंगुर्लेकर यांचा सत्कार!

मसुरे | झुंजार पेडणेकर
आदर्श महसूल कर्मचारी योगेश वेंगुर्लेकर यांचा बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे सत्कार करण्यात आला. तर बॅ नाथ पै वाचन मंदिराच्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन सरपंच शेखर पेणकर यांचे हस्ते करण्यात आले.

सेवांगणचे विश्वस्त दीपक भोगटे यांनी स्वागत केले.
योगेश वेंगुर्लेकर महसूल विभागात कर्मचारी म्हणून काम करताहेत. त्यांची वागणूक अत्यंत नम्र, सेवाभावी व लाघवी आहे. आलेल्या सर्वांची कामे अत्यंत तत्परतेने ते तत्परतेने करतात.या त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून जिल्हा महसूल प्रशासनाने त्यांना ‘आदर्श महसूल कर्मचारी’ म्हणून गौरव केला आहे. याचा आम्हासही आनंद वाटतो असे भोगटे म्हणाले.

सेवांगणचे अध्यक्ष बापू तळावडेकर यांचे हस्ते शाल व श्रीफळ, कार्याध्यक्ष श्याम पावसकर यांच्या हस्ते सन्मानपत्र व सरपंच शेखर पेणकर यांचे हस्ते भेटवस्तू देऊन योगेश वेंगुर्लेकर यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास योगेश वेंगुलेकर,बापू तळावडेकर, शाम पावसकर, शेखर पेणकर, दीपक भोगटे, , गणेश गाड, डॉ. सावंत, दादा वंजारी, धुत्रे गुरुजी, ऋषी पेणकर, सुनील नाईक, विलास बांदेकर, वंदेश ढोलम, . बाबू टेंबुलकर, सौ. भोजणे, सौ गुराम, सौ. कुबल, साक्षी अमरे, मंगल पराडकर, बाळकृष्ण गोंधळी सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.