शिरोडा गावचे पोलीस पाटील लक्ष्मण तांडेल यांचे निधन…

वेंगुर्ले : प्रतिनिधी
शिरोडा गावचे पोलीस पाटील तथा केरवाडी चे रहिवासी लक्ष्मण महादेव तांडेल (वय ५५ वर्ष) यांचे आज गुरुवार २० ऑगस्ट रोजी दुपारी उपचारा दरम्यान गोवा बांबूळी येथे निधन झाले.

दोन दिवसापूर्वी गोवा येथे त्यांचा अपघात झाला होता. अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी गोवा बांबूळी येथे दाखल करण्यात आले होते. मात्र आज उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस पाटील म्हणून ते गेले काही वर्षे शिरोडा भागात काम करत होते.