वेरळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी इक्बाल टोळे यांची बिनविरोध निवड

लांजा (प्रतिनिधी) : तालुक्यातील वेरळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी इक्बाल टोळे यांची आज गुरुवारी बिनविरोध निवड झाली.
वेरळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच असलेल्या श्रावणी जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपसरपंच पदी इक्बाल टोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडीनंतर इक्बाल टोळे यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, उपतालुकाप्रमुख सुजित आंबेकर, प. स. सदस्या सौ. दिपाली साळवी, पदाधिकारी शरद चरकरी , वेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच सुवर्णा जाधव- सरपंच, साईजिन टोले, महेश गुंड्ये, अनघा पाष्टे, श्रीमती पानकर , माजी सरपंच सुप्रिया चव्हाण , मंगेश डाकवे, तसेच बशीर वनू , नुरा टोले ,नईम टोले आदींकडून शुभेच्छा दिल्या.