मुंबई : चिपळूण येथील प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात आयोजित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या कार्यकर्ता मेळाव्यात महाराष्ट्रातील चिपळूण चे सुपुत्र आंतरराष्ट्रीय कोरिओग्राफर सूरज विलास जाधव यांना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या शुभहस्ते नुकतेच सन्मानित केले असून श्री. सूरज विलास जाधव हे भारतातील आघाडीचे नृत्य प्रशिक्षक, कोरिओग्राफर आणि डान्स स्पोर्ट्स क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आपल्या अथक परिश्रम, सातत्यपूर्ण कामगिरी आणि उत्कृष्ट नेतृत्वाच्या जोरावर त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव गौरवाने उंचावले आहे. त्यांच्या या कार्याला पाहून रिपब्लिकन पक्षाच्या रत्नागिरी चिपळूण च्या कार्यकर्त्यांनी सुरज जाधव यांचे अभिनंदन केले
सुरज जाधव हे आंतरराष्ट्रीय डान्स स्कूल चे संस्थापक व संचालक असून, हजारो विद्यार्थ्यांना व्यावसायिक नृत्य प्रशिक्षण देत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विजेते घडविले आहेत.आधुनिक तसेच स्पर्धात्मक नृत्यप्रकारांचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण दिले जाते.
संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सुवर्णपदके आंतरराष्ट्रीय पदक भारताचे प्रतिनिधित् शिष्यवृत्ती व्यावसायिक करिअर यामध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
ध्येय भारतातील प्रत्येक गुणवंत नृत्यपटूला जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देणे, डान्स स्पोर्ट्सला ऑलिम्पिक स्तरापर्यंत नेणे आणि भारताला जागतिक स्तरावर अग्रस्थानी पोहोचवणे हेच श्री. सूरज विलास जाधव यांचे ध्येय आहे.













