राजापूर महावितरण भाग एक मधील तीन्ही रिक्त पदांवर तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

शहर शाखा विभागाच्या सहाय्यक अभियंता प्राजक्ता माळवे यांची रत्नागिरीत बदली
निलेश पोतदार नवीन शहर सहाय्यक शाखा अभियंता
राजापूर प्रतिनिधी : राजापूर महवितरण राजापूर भाग एक विभागातील तीन रिक्त पदांवर नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली असून या नियुक्त्यांमुळे महावितरण राजापूरच्या कामकाजाला आता अधिक गती मिळणार आहे. तर यामुळे ग्राहकांनाही दिलासा मिळणार आहे.
राजापूरच्या शहर शाखा विभागाच्या सहाय्यक अभियंता प्राजक्ता माळवे यांची रत्नागिरी विभागात बदली झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागी निलेश पोतदार यांची नियुक्ती झाली आहे. प्राजक्ता मावळे यांनी आपल्या वर्षभराच्या कार्यकाळात अत्यंत चांगली कामगिरी करत ग्राहकांचा विश्वास संपादन केला होता. खास करून मान्सूनच्या प्रारंभी निर्माण झालेल्या गंभीर विज समस्येवर त्यांनी प्रभावी उपाययोजना करत ग्राहकांना दिलासा दिला होता.
महावितरणच्या राजापूर भाग एक मध्ये गेले काही वर्षे रिक्त असलेल्या सहाय्यक अभियंता गुणनियंत्रक विभागाच्या अधिकारी पदी पांडुरंग कांबळे यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे आता या विभागाचा विद्युत मिटर रिंडिंग व अन्य तपासणी कारभाराला गती मिळणार आहे.
तर राजापूर ग्रामीण शाखा कार्यालयाच्या रिक्त असलेलया सहाय्यक अभियंतापदी संतोष शेळके यांची नियुक्ती झाली आहे. या विभागाचे सहाय्यक अभियंता दगडू पांडाव हे सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त होते. या रिक्त पदावर शेळके यांची नियुक्ती झाली आहे.
महावितरणच्या राजापूर भाग एकमध्ये आता अधिकारी वर्गाची सर्व पदे भरण्यात आल्याने या विभागाच्या कामकाजाला गती मिळणार असून ग्राहकांनाही दिलासा मिळणार आहे. महावितरणकडून ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा आंम्ही प्रयत्न करू अशी ग्वाही महावितरण राजापूर भाग एकचे उपकार्यकारी अभियंता जमिर तांबोळी यांनी सांगितले.