शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास उर्फ भाई पाटील यांचे निधन

राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील सोलगाव भंडारवाडी येथील रहिवासी व सोलगांवचे माजी सरपंच आणि माजी जि. प. सदस्य सुहास सदाशिव उर्फ भाई पाटील (६७) यांचे रविवार 23 ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले.
रविवारी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान सुहास पाटील यांना रहाते घरी हृदयविकाराचा तिव्र झटका आला व त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
सुहास पाटील हे शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते होत. सोलगांवचे सरपंचपदही त्यानी भुषविले  होते. त्यांचा गावच्या विकासात्मक कामात नेहमीच सक्रीय सहभाग राहिला आहे. त्यांनी आपल्या सरपंच पदाच्या कार्यकाळात गावातील विकास कामांना गती देण्याचा प्रयत्न केला. एकसंघ शिवसेनेच्या काळात त्यांनी पाच वर्षे जिल्हा परिषद सदस्य म्हणून कामकाज पाहिले. तसेच गावातील ओंकार पतसंस्था तसेच सोलगांव विविध कार्यकारी सह. सोसायटीवर संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांच्या निधनाने एक हरहुन्नरी कार्यकर्ता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थीवावर रविवारी सांयकाळी अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन विवाहित मुली,  भाऊ, सुन, नातवंडे असा परिवार आहे.
–